राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा: सुरेशचंद्र राजहंस

मुंबई, दि ३१
लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांच्या विरोधात मुंबईत आज केले जात असलेले भाजपचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा… मराठा आरक्षण आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अमित साटम यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपाची आंदोलनाच्या नावाखाली नौटंकी सुरू आहे असा टीका मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली हे पुराव्यासह सिद्ध केले आहे.निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती परंतु दुर्दैवाने ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने. राहुल गांधी यांनी जो घोटाळा दाखवला त्यातून निवडणूक आयोगाबरोबरचे हितसंबंध उघडे पडतील यामुळे भाजपा आणि त्यांचे नेते अस्वस्थ झाले आहेत म्हणून त्यांची ही नौटंकी सुरू आहे असे सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.KK/ML/MS