विद्यापीठाच्या निकालामध्ये गोंधळ, विद्यार्थ्यांना मनस्ताप

कोल्हापूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवाजी विद्यापीठाचं शैक्षणिक वर्ष पूर्ववत होत असताना शैक्षणिक वर्ष २०२२-२३
च्या प्रथम सत्रांच्या परीक्षांचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. दोन वर्षानंतर प्रथमच विद्यार्थी लेखी परीक्षेला सामोरे गेले.
परीक्षा विषयात विद्यापीठाच्या ढिसाळ कारभार आणि पेपरफुटीसारख्या गोष्टींमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर या काळात प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
यातच भर घालत विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं हजारो विद्यार्थ्यांचे चुकीचे निकाल लावत विद्यार्थ्यामध्ये गोंधळ निर्माण केला आहे. Confusion in university results, students’ heartache
या निकालात बऱ्याच विद्यार्थ्यांना एकसारखे
गुण देणं, निकाल न दिसणं, उत्तीर्ण होणारे गुण मिळवूनही अनुत्तीर्ण दाखवणं, कमी गुण
मिळवूनही उत्तीर्ण दाखवणं, गुणांच्या जागी ‘#, *, ?’ असे चिन्ह असणं अशा प्रकारच्या समस्या विद्यार्थ्यांना आलेल्या आहेत.
या निकालातील गोंधळामुळे “ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा निकालाबाबत साशंकता
आहे, त्या विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यापीठ प्रशासनानं लवकरात लवकर सोडवाव्यात, अन्यथा शिवाजी
विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल,” असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री
अमोघ कुलकर्णी यांनी दिला.
शिवाजी विद्यापीठाचा परीक्षांच्या निकालाबाबतचा हा सावळा गोंधळ चिंताजनक आहे.
या निकालांमधील अनियमिततेमुळे एकाही विद्यार्थ्यावर अन्याय अभाविप होऊ देणार नाही, अशी ग्वाही आज आंदोलन प्रसंगी महानगर मंत्री दिग्विजय गरड यांनी दिली.
ML/KA/PGB
10 Apr. 2023