अध्यक्षांच्या अवमान प्रकरणी विधानसभेत गोंधळ

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यपालांनी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसमोर केल्यानंतर त्यांचे आभार मांडणारा प्रस्ताव मांडण्याच्या मुद्द्यावर विधानसभेत काही काळ गदारोळ झाला होता.
अधक्ष राहूल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव मांडला , त्याला संजय कुटे यांनी अनुमोदन दिलं, याला भास्कर जाधव यांनी विरोध करीत काही बोलण्याचा प्रयत्न केला.Confusion in the Legislative Assembly over contempt of the President
त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेत जाधव अध्यक्षांना उद्देशून असे धमकावत असल्याचे सांगत हे योग्य नाही असे म्हटले. त्यामुळे सत्तारूढ सदस्य आक्रमक झाले, विरोधी सदस्यही जागेवर उभे राहून बोलू लागले मात्र अध्यक्षांनी सगळ्यांना शांत करीत जाधव यांना सभागृहाची परंपरा राखावी अशी समज दिली. यावर भास्कर जाधव यांनी सहमती दर्शवली आणि आपल्याला मुद्दा उपस्थित करायचा होता, आपला आवाज मोठा आहे, मात्र अध्यक्षांनी ही आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यपालांच्या आभाराचा प्रस्ताव सत्तारूढ बाजूने मांडला जावा आणि त्याला त्यांच्या सहयोगी पक्षाने अनुमोदन द्यावे अशी आपली प्रथा असल्याचं ते म्हणाले.
ML/KA/PGB
27 Feb. 2023