रथसप्तमी निमित्ताने सामुदायिक सूर्य नमस्कार

 रथसप्तमी निमित्ताने सामुदायिक सूर्य नमस्कार

नाशिक, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक सूर्यनमस्कार दिना निमित्त आज रथसप्तमीच्या दिवशी उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने नाशिक येथील प्रसिद्ध बी ए पी एस स्वामीनारायण मंदिराच्या प्रांगणात झालेल्या सामुदायिक सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम झाला. यात नाशिककरांनी उस्फूर्त सहभाग घेतला.

योग क्षेत्रातील सर्वात जुनी संस्था असलेल्या नाशिक योग विद्या केंद्राचे वतीने आयोजित या उपक्रमांमध्ये संस्थेचे पदाधिकारी सतीश महाजन, उमेश निफाडकर, अपर्णा फडणीस तसेच संस्थेच्या अन्य योग साधकांनी सूर्यनमस्कार उपक्रमामध्ये सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन करून सूर्यनमस्कार व्यायाम प्रकाराचे महत्त्व सांगितले. नाशिक स्वामीनारायण मंदिराचे मुख्य स्वामी महाव्रत स्वामी सुबोध सागर यांच्या शुभहस्ते देवतांचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन तसेच आदित्य प्रार्थनेने सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रमाला प्रारंभ झाला . मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार उपक्रमात सहभागी झालेल्यांनी सूर्यनमस्कार घातले.

सूर्यनमस्कार साधनेमध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. यावेळी साधकांना मार्गदर्शन करताना नाशिक योग विद्या केंद्राचे अध्यक्ष सतीश महाजन म्हणाले की सूर्य ही आरोग्याची देवता आहे. त्यामुळे नियमितपणे सूर्यनमस्कार घालणे आवश्यक आहे . योगा प्रमाणे सूर्यनमस्कार ही देखील सनातन परंपरा आहे सूर्यनमस्कारा मध्ये विविध 10 योगासनांच्या स्थिती असल्यामुळे सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम असेही म्हणतात. स्वामीनारायण मंदिरातर्फे प्रतिवर्षी सूर्यनमस्कार दिनी हा उपक्रम यापुढे राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. Community Surya Namaskar on the occasion of Rathasaptami

ML/KA/PGB
16 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *