व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त
नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हॉटेल व्यावसायिक आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांना केंद्र सरकारने आज काहीसा दिलासा दिला आहे. आज पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ९२ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर २०२८ रुपयांवर आला आहे. परंतु घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. १४.२ किलो गॅस सिलिंडरचा दर गेल्या महिन्याइतकाच आहे.
१ मार्च रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ३५०.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. यानंतर तो दिल्लीत २११९.५० रुपयांवर पोहोचला होता. तसेच १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत त्याची किंमत ११०३ रुपये झाली आहे.
जून २०२० पासून बहुतांश लोकांना एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळत नाही. आता उज्ज्वला योजनेंतर्गत ज्यांना सिलिंडर देण्यात आले आहेत, त्यांनाच २०० रुपये अनुदान मिळते.
SL/KA/SL
1 April 2023