कुलाबा येथील पुनर्विकास मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि ४
कुलाबा येथील साबुसिद्दीक मार्ग येथील इमारत क्र. १, २ आणि ३ चा पुनर्विकास मार्गदर्शन मेळावा नुकताच जल्लोषात संपन्न झाला. या मेळाव्याला विधानसभा अध्यक्ष स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
भावपूर्ण विकास प्रकल्प घेणार अनेक वर्षापासून रखडलेला होता. त्यानंतर माजी नगरसेवक सुरेश नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर यांनी जी मेहनत घेतली होती वाखाणण्याजोगी आहे. मी तुमचे मनापासून स्वागत करतो.
रहिवाशांचे सुरक्षित व आधुनिक सोयींनी सुसज्ज घराचे स्वप्न या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याचा मला आनंद आहे. रहिवाशांचे हे स्वप्न लवकर पूर्ण व्हावे यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, सर्व नियमांचे पालन करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही लवकर करावी अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाषणातून व्यक्त केली.KK/ML/MS