ख्रिसमस , नववर्ष गोव्यात , रेल्वेने केली खास व्यवस्था

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीची सुट्टी संपल्यावर आता हौशी पर्यटक पर्यटकांना नाताळ आणि नववर्षानिमित्त गोव्यात जाण्याचे वेध लागले आहेत. Christmas, New Year in Goa, Railways made special arrangements
नाताळ व नववर्ष स्वागतासाठी गोव्याला जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेकडून गोव्याला २२ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
नाताळ स्पेशल या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते करमाळी, पुणे जंक्शन ते करमाळी आणि आणि पनवेल ते करमाळी या स्थानकादरम्यान धावणार आहेत.
विशेष गाड्या
१.सीएसएमटी ते करमाळी (०२०५१ ) ही स्पेशल गाडी २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी दुपारी २ वाजता थिविमला पोहोचेल. तर
२.थिविम – सीएसएमटी (०११५२) ही विशेष दैनिक गाडी थिविम येथून २२ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान दररोज दुपारी ३ वाजता सुटेल. तर दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
३.पुणे जं. – करमाळी (०१४४५) विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून २२ आणि २९ जानेवारीला सायंकाळी ५:३० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता करमाळीला पोहोचेल.
४.करमाळी – पुणे जंक्शन (०१४४६) विशेष (साप्ताहिक) २४ आणि ३१ डिसेंबर रोजी करमाळी येथून सकाळी ९:२० वाजता सुटेल. ही ट्रेन रात्री ११:३५ वाजता पुणे जंक्शनला पोहोचेल. गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल.
SL/ KA/ SL
19 Nov. 2023