सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी !

 सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी !

सिंधुदुर्ग दि ३ – सिंधुदुर्गातील चीपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. डीसीजीए ( DCGA ) कडून आयएफआर (IFR) लायसन्स आणि ऑपरेशन्सना मंजुरी मिळाल्यामुळे, आता या विमानतळावर रात्रंदिवस, सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित विमानसेवा उपलब्ध होणार आहे. विमानतळावरील पार्किंगची क्षमता देखील 3 वरून 6 विमानांपर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे विमानतळाची कार्यक्षमता दुप्पट झाली आहे.

डिसेंबर महिन्यात तब्बल 11,000 प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला असल्याने सिंधुदुर्ग विमानतळ देशातील 75 प्रमुख विमानतळांच्या यादीत मानाने स्थान मिळवेल, असा ठाम विश्वास वाटतो. लवकरच मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवाही सुरू होणार असून, या सर्व सोयी-सुविधांमुळे पर्यटनाला अभूतपूर्व चालना मिळेल आणि कोकणच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार होईल.

नाईट लँडिंगला च्या परवानगी साठी खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे कडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
विमानतळ येथे नाईट लँडिंग साठी आवश्यक असणारा विद्युत पुरवठा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंनी जिल्हा नियोजन मधून अडीच कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यामुळे चिपी विमानतळाला आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत झाला आणि पुढील परवानगी मिळण्यास सोईचे ठरले.

त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सातत्याने वेळोवेळी सहकार्य केले केंद्र सरकारशी आणि हवाई उड्डाण मंत्र्यांशी राज्य सरकारकडून जो संवाद आणि पत्रव्यवहार होणे गरजेचे होते तो करण्यात आला. या सर्वच गोष्टींमुळे चिपी विमानतळ नाईट लँडिंग परवानगी मिळण्यास सोईचे ठरले. मुंबईसह अन्य मोठ्या शहरातून विमानसेवा सुरू होण्यास मार्ग झाला सुकर झाला आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *