२६ आणि २७ एप्रिल रोजी होणारा बाल साहित्याचा उत्सव

ठाणे दि २४– बाल वाचकांसाठी विशेषतः आयोजित करण्यात आलेला “बुक कल्चर बाल वाचक महोत्सव २०२५” हा दोन दिवसीय बाल साहित्यिक सोहळा २६ आणि २७ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. बालसाहित्याचा प्रसार आणि वाचनाची गोडी वाढविण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
या सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के तसेच अतिरिक्त आयुक्त ठाणे महानगर पालिका संदीप माळवी तसेच मीनाक्षी पाटील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सचिव प्रवीण दवणे या सोहळ्याचे प्रमुख उदघाटक प्रदीप ढवळ या सारखे मान्यवर असणार आहेत.
बुक कल्चर बाल वाचक संस्था ठाणे ही गेले सात वर्षे बाल वाचन क्षेत्रात कार्यरत असून दरवर्षी जे बाल वाचक सातत्याने वाचन , १०० हून अधिक पुस्तके वाचतात अश्या बाल वाचकांचा बाळ वाचक गौरव पुरस्कार सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला जातो. तसेच जागतिक पुस्तक दिनानिमित्त येत्या शनिवार आणि रविवारी दि २६ , २७ एप्रिल रोजी लहान मुलांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन केले असून या कार्यशाळा सर्वासाठी खुल्या असणार आहेत.
वयोगट ३ पासून पुढील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात या कार्यशाळा विनामूल्य असून पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी आपण सर्व पालक वर्गास आवाहन आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या मुलांना या कार्यशाळेच्या उपक्रमात सहभागी करावे. अधिक माहिती साठी खाली दिलेला स्कॅन कोडे द्वारे आपण नोंदणी करू शकता.
दिनांक: २६,२७ एप्रिल २०२५
वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६:०० वाजता
स्थळ: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक,
तीन हात नाका फ्लायओव्हर,
धर्मवीर नगर,
मुलांसाठी विविध कार्यशाळा, गोष्टींचे सादरीकरण, पुस्तकांचे प्रदर्शन,. तसेच विविध सर्जनशील उपक्रमांद्वारे मुलांचे वाचन आणि लेखन यातील कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सर्व पालक, शिक्षक आणि बालवाचकांना या महोत्सवात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चला, एकत्र येऊन बालसाहित्याचा आणि वाचन संस्कृतीचा उत्सव साजरा करूया!
अधिक माहितीकरिता संपर्क:
७३०४८८६६००