मुख्यमंत्र्यांनी केले हुतात्म्यांना अभिवादन

 मुख्यमंत्र्यांनी केले हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०७ हुतात्म्यांना हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले. मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.

ML/KA/SL

21 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *