न्या. धनंजय चंद्रचूड यांनी घेतली ५० वे सरन्यायाधिश म्हणून शपथ

 न्या. धनंजय चंद्रचूड यांनी घेतली ५० वे सरन्यायाधिश म्हणून शपथ

नवी दिल्ली, दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज न्या. धनंजय चंद्रचूड यांना सरन्यायाधिशपदाची शपथ दिली. ते  आता भारताच्या ५० व्या सरन्यायाधिशपदी विराजमान झाले आहेत.राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. पुढची दोन वर्षे ते या पदावर राहणार आहेत.

न्या. चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून  गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर याच विद्यापीठातून ते LLB झाले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून LLM ही पदवी मिळवली. तसंच त्यांना हार्वर्ड विद्यापीठाने न्यायशास्त्र विषयाचा जोसेफ बेले पुरस्कार देऊन गौरवले. न्यायशास्त्र या विषयात त्यांनी पीएचडीही केली.

मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत असताना चंद्रचूड यांनी रिझर्व्ह बँक, ONGC, अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ऑक्टोबर 2013 ते अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती झाले. मे 2016 ला ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले.

धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड हे देखील सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड 1978  ते 1985  या काळात भारताचे सरन्यायाधीश होते.  न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड तब्बल सात वर्षे चार महिने इतका सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदावर राहिले.

9 Nov. 2022

SL/KA/SL

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *