अखेर छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव झालेच
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद आणि उस्मानाबाद ही नावे बदलण्याचा वर्षानुवर्षे भिजत राहिलेला पेच आता सुटला आहे. औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने आज मंजुरी दिली आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत माहिती दिली आणि पंतप्रधान नरेंद्र व केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’असेही फडणवीस यांनी म्हटले.
SL/KA/SL
24 Feb. 2023