झुडियोच्या स्वस्ताईमागचे हे आहे रहस्य

 झुडियोच्या स्वस्ताईमागचे हे आहे रहस्य

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ब्रॅंडेड कपडे वापरणं ही तरुणाईची क्रेझ सर्वश्रुत आहे.पण ब्रॅंडेड कपडे म्हटले की त्याच्या किंमती बघूनच धडकी भरते आणि ही आपल्या बजेट फ्रेंडली खिशाला अगदीच न परवडणारी गोष्ट आहे. पण याच सगळ्या तरुणांच्या अडचणींना समजून घेणारा झुडियो ब्रॅंड म्हणावा लागेल.
झुडियोच्या कपड्यांची किंमत बघता लोकांमध्ये यांच्या स्वस्त किमतीबाबत अनेक चर्चा आहेत.असा मालक जो आपल्याला तोट्यात ठेवून खर्च करेल? म्हणजे झुडियो तोटा स्वीकारून इतर ब्रॅंडेड कंपनींच्या मार्केटमध्ये टिकण्यासाठी आपल्या कपड्यांची किंमत कमी ठेवतं पण हे कसं शक्य आहे?
झुडियो कंपनी आपल्या देशातल्या सर्वात जुन्या व मानाच्या टाटा ग्रुपची एक कंपनी आहे. याचे चेअरमन नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. झुडियोचे सध्या देशातील ३३३ आउटलेट्स आहेत. झुडियोची सुरुवात २०१६ मध्ये बंगळुरूमधून झाली पण याचा पाया हा १९९८ मध्ये रचण्यात आला होता. टाटा ग्रुपने आपल्या मालकीच्या लॅक्मे या ब्रँडचा ५० टक्के शेअर १९९८ मध्ये २०० कोटीच्या व्यवहार करून हिंदुस्थान युनिलिव्हरला विकला. यातून आलेल्या पैशातून ट्रेंट या कंपनीची उभारणी झाली. गंमत म्हणजे ट्रेंट अंतर्गत वेस्टसाइड, स्टार व लँडमार्क या कंपनी सुद्धा आहेत.झुडियो २०१६ ला जेव्हा भारतात आलं तेव्हा मॉल मध्ये जाऊन ब्रँडेड कपडे खरेदी करण्याचा ट्रेंड सुरू झाला होता याचाच विचार करून झुडियोने आपले प्रत्येक आउटलेट हे ब्रँड हाय क्लासला शोभेल अशा दर्जाचे बनवले. ही गुंतवणूक एकाच वेळी केलेली असली तरी त्याचा फायदा अद्यापही कंपनीला होतो आहे. ट्रेंट कंपनीच्या एकूण नफ्याचा १३ टक्के वाटा हा झुडियोचा आहे.झुडियोची आपल्या जाहिरातींवर खर्च करत नाही, त्यांच्यामते हा सर्वसामान्य लोकांसाठीचा ब्रॅंड आहे त्यामुळे उगाच सेलेब्रिटींना घेऊन कोट्यवधी रुपये खर्च करणं गरजेच नाही. झुडियो आपले कपडे बल्कमध्ये उत्पादित करते शिवाय हे रोजच्या वापरासाठी कामात येतील यावर लक्ष केंद्रित करुन केले जातात परिणामी त्यासाठी लागणारा खर्च हा कमी असतो.This is the secret behind Zudio’s cheapness

ML/KA/PGB
24 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *