भंगार मधील केमिकल ड्रम चा स्फोट, दोन ठार

 भंगार मधील केमिकल ड्रम चा स्फोट, दोन ठार

ठाणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भिवंडी शहरालगत खोणी ग्रामपंचायतीतील तलवली नाका या ठिकाणी भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या गोदामातील केमिकल ड्रम मधील केमिकलचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेमध्ये दोघा जणांचा जागेवरती मृत्यू झाला आहे.Chemical drum explodes in debris, two killed

घरत कंपाऊंड येथे भंगार व्यवसाय करणाऱ्याचा गोदाम असून त्या ठिकाणी बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास भंगार व्यवसायिक रमजान मोहम्मद जमील कुरेशी आणि मोहम्मद इस्राईल शेख असे गोदामात बसून भंगार व ड्रम मधील केमिकल तपासत असताना एक कामगार विडी पीत असल्याने त्याचा संपर्क केमिकल सोबत होऊन केमिकल ड्रम चा मोठा स्फोट झाला .

यामध्ये दोघे हे लांब फेकले गेले ज्यामध्ये या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून आले.विशेष म्हणजे या केमिकल मुळे आग लागली नाही परंतु काही प्रमाणात धूर निघत होता.स्थानिक निजामपुरा पोलिसांनी घटनेची नोंद घेत दोन्ही शवं शासकीय रुग्णालयात रवाना केले आहेत.परंतु ड्रम मध्ये नक्की कोणते केमिकल होते याची माहिती मिळू शकली नाही.

ML/KA/PGB
1 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *