नव्या फीचर्सने व्हॉट्सॲपचे चॅटिंग होणार मजेशीर

 नव्या फीचर्सने व्हॉट्सॲपचे चॅटिंग होणार मजेशीर

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आपल्या फोनमधील ॲप्स अपडेट झाल्यावर नवनवीन फीचर्स तुमच्या ॲपला प्रो फील देते. व्हॉट्सॲपच्या अपडेटेड व्हर्जनमध्येही असेच भन्नाट फीचर्स आले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘अवतार’ची अफलातून दुनिया लॉन्च केली आहे. कंपनीने बहुप्रतीक्षित अ‍ॅनिमेडेट अवतार डीपी फीचर आणि अवतार स्टिकर्स नुकतेच आयओएस आणि अ‍ॅण्ड्राइडसाठी उपलब्ध केले आहेत. यात वापरकर्ते स्वतःची अ‍ॅनिमेडेट थ्रीडी प्रतिमा तयार करून, तब्बल ३६ स्टिकर्स बनवू शकतात.Chatting on WhatsApp will be fun with new features

व्हॉट्सअ‍ॅपने अवतारमध्ये ३६ कस्टम स्टिकर्सही दिले आहेत. वेगवेगळ्या मूडमध्ये हे स्टिकर्स आहेत. याद्वारे वापरकर्ते मेसेजद्वारे आपल्या भावना व्यक्त करू शकतात. अत्यंत मजेशीर असणाऱ्या या स्टिकर्समध्ये अफलातून अशा रिअ‍ॅक्शन देण्यात आल्या आहेत. ज्या हुबेहूब वापरकर्त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव व्यक्त करतात. शिवाय हे स्टिकर्स वापरकर्ते एडिटही करू शकतात.

अवतारमुळे मेसेजवर चॅटिंग करणे अधिक मजेशीर आणि सोपे होणार आहे. आपला फोटो कोणालाही न पाठवता आपल्या चेहऱ्यावरील हावभाव या अवतार स्टिकर्सद्वारे वापरकर्ते शेअर करू शकतात. यातील काही स्टिकर्सही अत्यंत अतरंगी, उत्तम हावभाव असलेले असल्याने वापरकर्त्यांची चॅटिंगची मजाही दुप्पट होणार आहे. विशेष म्हणजे, मेसेज टाइप न करता वापरकर्ते स्टिकर्सच्या माध्यमातून आपल्या भावना समोरील व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतात. यामुळे वेळेचीही बचत होणार आहे.

ML/KA/PGB
15 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *