१ एप्रिल पासून या UPI पेमेंटवर आकारले जाणार शुल्क

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UPI द्वारे होणाऱ्या व्यापारी व्यवहारांवर आता शुल्क आकारले जाणार आहे.. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच एक परिपत्रक जारी केले आहे ज्यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ला व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क लागू करण्यास सांगितले आहे. परिपत्रकानुसार २,००० रुपयांपेक्षा जास्तीच्या UPI व्यवहारांवर १.१ टक्के शुल्क भरावे लागेल. हे शुल्क वापरकर्त्याला व्यापारी व्यवहारांसाठी भरावे लागणार आहे.
प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) च्या UPI पेमेंटवर १.१ शुल्क आकारले जाणार आहे. पीपीआयमध्ये वॉलेट किंवा कार्डद्वारे व्यवहार केला जातो हे आपल्याल माहितीच आहे. इंटरचेंज शुल्क सामान्यत: कार्ड पेमेंटशी संबंधित असतात आणि व्यवहार स्वीकारण्यासाठी आणि खर्च कव्हर करण्यासाठी आकारले जातात.
UPI पेमेंट सिस्टीम सध्या शून्य व्यापारी सवलत म्हणजेच (MDR )मॉडेलवर चालते. मात्र UPI साठी नवीन नियम आल्यामुळे यामध्ये अधिक चार्ज लावला जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये चार्जेस संबंधित नवीन मॉडेलचे ३० एप्रिलपर्यंत किंवा त्याआधीच त्याचे पुनरावलोकन केले जाऊ शकते.
SL/KA/SL
29 March 2023