15 हजार कोटी रुपयांच्या परकीय थेट गुंतवणूकीच्या प्रस्तावाला मंजूरी

 15 हजार कोटी रुपयांच्या परकीय थेट गुंतवणूकीच्या प्रस्तावाला मंजूरी

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारने बुधवारी कॅनडाच्या निवृत्तीवेतन निधीची उपकंपनी असलेल्या अँकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेडच्या (Anchorage Infrastructure Investment Holdings) 15,000 कोटी रुपयांच्या परकीय थेट गुंतवणुकीच्या (FDI) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीईए) बैठकीत एफडीआय प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
ही परकीय थेट गुंतवणूक केवळ पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी आहे. यात वाहतूक आणि लॉजिस्टिक तसेच विमानतळाशी संबंधित सेवा (डाउनस्ट्रीम) आणि विमान वाहतूक संबंधित व्यवसाय आणि सेवा यांचा समावेश असू शकतो.

कॅनडाची सर्वात मोठी निश्चित लाभ देणारी पेन्शन योजना
Canada’s largest fixed benefit pension scheme

अधिकृत निवेदनानुसार, बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड मधील हिस्सेदारीचा अँकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेडला (Anchorage Infrastructure Investment Holdings) हस्तांतरणात समावेश आहे. याव्यतिरिक्त, ओंटारियो इंक द्वारे अँकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लि. मधील 950 कोटी रुपयांची गुंतवणूक याच्याशी संबंधित आहे. ओंटारियो इंक ही ओएसी ची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे, जी ओेएमईआरएसचे संचालन करते, असे निवेदनात म्हटले आहे. ही कॅनडाची सर्वात मोठी निश्चित लाभ देणारी पेन्शन योजनांपैकी एक आहे.

याठिकाणी होणार गुंतवणूक
Investment will be made here

त्यात म्हटले आहे की ही गुंतवणूक पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्र तसेच विमानतळ क्षेत्राला चालना देईल. यामुळे विमानतळ आणि वाहतूक संबंधित पायाभूत सुविधा जागतिक स्तरावर विकसित करण्याच्या सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास मदत होईल. निवेदनानुसार, गुंतवणूकीमुळे पायाभूत क्षेत्राला वित्तपुरवठा करण्यापासून ते सार्वजनिक क्षेत्रातील मालमत्ता बाजारात आणण्याशी संबंधित या आठवड्यात जाहीर केलेल्या राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईनलाही गती प्राप्त होईल.
 

गुंतवणूकीमुळे रोजगार निर्मिती होईल
Investment will create jobs

अँकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लि. ने (Anchorage Infrastructure Investment Holdings) राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन (NMP) अंतर्गत येणार्‍या काही मालमत्तांशी संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे. निवेदनानुसार, गुंतवणूकीमुळे रोजगार निर्मिती होईल कारण ज्या क्षेत्रात अँकोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लि. ने गुंतवणूकीच्या प्रस्ताव दिला आहे, ते भांडवल केंद्रित तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणारे क्षेत्र देखील आहे.
The government on Wednesday approved a Rs 15,000 crore foreign direct investment (FDI) proposal by Anchorage Infrastructure Investment Holdings Limited, a subsidiary of Canada’s pension fund. The proposal is for investment in the infrastructure sector.
PL/KA/PL/26 AUG 2021
 

mmc

Related post