देशभरात ख्रिसमसची धूम, उत्साहाचे वातावरण
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशभरात ख्रिसमस सणाची जोरदार तयारी पाहायला मिळते आहे. ख्रिसमस सणानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी सजावट आणि सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे तसेच ठिकठिकाणी ख्रिस्त बांधवांनी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली. सांताक्लॉजने मुलांना खाऊ दिल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. पुण्यात कॅंप भागात रात्री बारा वाजता आकाशात लाल फुगे सोडण्यात आले. शहरातल्या बेकऱ्यांमध्ये प्लम केक, जिंजरब्रेड खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
ML/ML/PGB
25 Dec 2024