आपचे उमेदवार जाहीर
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे विदर्भ संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे , अमरावती पदवीधर मतदारसंघातून पक्षाच्या अकोला जिल्ह्यातील नेत्या डॉ. भारती दाभाडे व नाशिक पदवीधर मतदार संघातून धुळ्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील या तिघांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
आम आदमी पार्टीच्या विकासाच्या दिल्ली मॉडेल प्रमाणे महाराष्ट्रात देखील शिक्षण, वीज, आरोग्य, महिला सबलीकरण, शेती शेतकरी व गुड गव्हर्नन्स आदी क्षेत्रात काम होण गरजेचं असून या निवडणुकीच्या प्रचारातून पक्षाची विचारधारा शिक्षक व पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पक्षाच्या यंत्रणेमार्फत केला जाईल व त्यास मतदारांचा नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची पक्षाला खात्री आहे.
महाराष्ट्रातील शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न खूप आहेत. आम आदमी पक्ष त्यांचं बाजूने उभा राहून, हे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल, ही खात्री असल्यामुळे, महाराष्ट्रातील शिक्षक व पदवीधर मतदार, आपच्या उमेदवारांना भरभरून मतदान करतील असा विश्वास आम आदमी पार्टी
सचिव धनंजय शिंदे यांनी व्यक्त केला.
ML/KA/PGB
17 Jan. 2023