कॅगकडून मुंबई महापालिकेतील व्यवहाराची चौकशी सुरू

 कॅगकडून मुंबई महापालिकेतील व्यवहाराची चौकशी सुरू

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या 12 हजार कोटींच्या कामाची चौकशी कॅगकडून सुरू झाली असून येत्या १६ डिसेंबरपूर्वी कॅगची टीम हे ऑडिट पूर्ण करणार आहे. आज सकाळी 11 वाजता कॅगचे सुमारे १० जणांचे पथक पालिकेत दाखल झाले.A team of about 10 people of CAG entered the municipality at 11 am today.

हे पथक गेल्या तीन वर्षात पालिकेने केलेल्या १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कामांचे परीक्षण करणार आहे. कॅगच्या या टीमला पालिका अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले. तत्पूर्वी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पालिका अधिकारी, रुग्णालयांचे डीन तसेच जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख असलेले नोडल ऑफिसर यांची बैठक घेतली.
सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप भाजपाने आणि कॉंग्रेसने केला होता. पालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंजूर झालेल्या अनेक प्रस्तावांवर राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेतील व्यवहारांची कॅग द्वारे चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार कॅगची टीम पालिकेत दाखल झाली आहे. येत्या १६ डिसेंबरपूर्वी कॅगची टीम हे ऑडिट पूर्ण करणार आहे.CAG is investigating the affairs of Mumbai Municipal Corporation

28 नोव्हेंबर 2019 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत पालिकेच्या दहा विभागांमध्ये झालेल्या 12 हजार 23 कोटी 88 लाख रुपये खर्चाच्या कामांचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यात करोनाकाळात खर्च झालेले 3538.73 कोटी, दहिसर येथे अजमेरा यांच्या भूखंडाची 339.14 कोटींना पालिकेने केलेली खरेदी, चार पुलांच्या बांधकामावर झालेला 1496 कोटींचा खर्च, करोनाकाळात तीन रुग्णालयात करण्यात आलेली 904.84 कोटींची खरेदी, शहरातील 56 रस्त्यांच्या दुरुस्तीवरील 2286.24 कोटींचा खर्च, सहा सांडपाणी प्रकल्पावरील 1084.61 कोटींचा खर्च, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरील 1020.48 कोटींचा खर्च आदींचे लेखापरीक्षण होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ML/KA/PGB
22 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *