भायखळा येथे श्री गाडगे महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त झाले विविध कार्यक्रम
मुंबई, दि 22-
निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या 69 पुण्यतिथी निमित्त भायखळा येथील श्री गाडगे महाराज धर्मशाळा येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाबांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी धर्मशाळेत राहणारे कॅन्सरग्रस्त व त्यांचे नातेवाईक यांना खाऊ, मिठाई आणि मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले , तसेच या ठिकाणी श्री संत गाडगेबाबा यांच्यावरिल दिनदर्शिकाचे उद्घाटन विदर्भ वैभव मंदिराचे सरचिटणीस गजानन नाग यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आली, या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते गाडगेबाबा मिशनचे संचालक श एकनाथ ठाकूर, दादर धर्मशाळेचे संचालक प्रशांत देशमुख, व्यवस्थापक अमोल ठाकूर विदर्भ समाज संघ मिरा भाईंदर चे अध्यक्ष श्री संजय जायभाये, डॉ फुटाणे आणि इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमास सहभागी झाले
होते.आम्ही दरवर्षी गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध सामाजिक लोकोपयोगी आणि अन्नदान वाटपाचे कार्यक्रम घेत असतो. यावर्षी देखील आम्ही विविध लोकोपयोगी आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्याचा लाभ सर्व स्तरातील नागरिकांनी गोरगरीब गरजू रुग्णांनी देखील घेतला. यापुढे देखील आम्ही असेच प्रकारचे सामाजिक कार्य सुरू होणार असल्याची माहिती विदर्भ वैभव मंदिर संस्थेचे सरचिटणीस गजानन नागे यांनी दिली.KK/ML/MS