शहरी बस वाहतुकीमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

रत्नागिरी, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य परिवहन विभागामध्ये रत्नागिरी आगाराच्या शहरी बस वाहतुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना १००%, ६५ ते ७५ वर्षा पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० % तसेच महिलानां ५०% सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे. २२ जून मध्यरात्रीपासून अनुज्ञेय करण्यात येत असल्याची माहिती विभाग प्रमुख नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच ६५ ते ७५ वर्षा पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना या सवलतीकरिता आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र / राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना दिलेली ओळखपत्र (मात्र त्यावर फोटो, जन्मतारीख, रहिवासी पत्ता अनिवार्य आहे). पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स तहसिलदार यांनी दिलेले ओळखपत्र, डी जी लॉकर, एम आधार व रा.प. महामंडळाव्दारे देण्यात आलेले स्मार्ट कार्ड ही ओळखपत्रे ग्राह्य धरण्यात येत आहे.
ML/ML/PGB
23 Jun 2024