महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुरक्षा रक्षक अजित सिंग यांना कांस्य पदक

 महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुरक्षा रक्षक अजित सिंग यांना कांस्य पदक

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलातील सुरक्षारक्षक अजित सिंग यांनी पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील ‘रिले रेस’ या प्रकारातील धावण्याच्या शर्यतीत अव्वल कामगिरी करीत कांस्य पदक पटकाविले आहे.
भांडुप संकुल येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अजित सिंग यांच्या या गौरवामुळे मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. Bronze Medal to Security Guard Ajit Singh in Maharashtra State Olympic Games

महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे अजित सिंग हे सन २०१४ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपली नोकरी सांभाळून ते दररोज व्यायाम करण्यासह धावण्याचा देखील नियमित सराव करीत असतात. अजित सिंग हे गेली १४ वर्षे विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित असून गेल्यावर्षी लखनौ येथे झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत त्यांनी रौप्य पदक पटकाविले होते. या व्यतिरिक्तही इतर अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. श्री. सिंग यांनी आपल्या या यशाचे श्रेय कुटुंबियांसोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलातील वरिष्ठांना व सहका-यांना दिले आहे.

ML/KA/PGB
11 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *