ब्रिटनचे राजा चार्ल्स यांनी भावाला काढले घराबाहेर
 
					
    इंग्लंड. दि. ३१ : ब्रिटनचे राजा चार्ल्स यांनी त्यांचा धाकटा भाऊ अँड्र्यू याच्याकडून राजकुमारपद काढून घेतले आहे आणि त्यांना त्यांच्या विंडसर येथील घरातून बाहेर काढले आहे. बकिंगहॅम पॅलेसने गुरुवारी ही घोषणा केली की, जेफ्री एपस्टाईन घोटाळ्याशी संबंधित अँड्र्यूच्या संबंधांमुळे ते राजघराण्याला त्याच्यापासून दूर ठेवू इच्छितात. आतापर्यंत प्रिन्स अँड्र्यू ‘प्रिन्स अँड्र्यू, ड्यूक ऑफ आर्क’ म्हणून ओळखले जात होते.
अँड्र्यूचा दीर्घकाळापासून जेफ्री एपस्टाईनशी संबंध आहे, जो अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला अमेरिकन गुन्हेगार आहे.
पीडित व्हर्जिनिया गिफ्रे हिने आरोप केला आहे की २००१ मध्ये जेव्हा ती १७ वर्षांची होती तेव्हा प्रिन्स अँड्र्यूने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.
६५ वर्षीय अँड्र्यू हे दिवंगत राणी एलिझाबेथ यांचे दुसरे पुत्र आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना ड्यूक ऑफ यॉर्क ही पदवी वापरण्यासही बंदी घालण्यात आली होती. बकिंघम पॅलेसने म्हटले आहे की, त्यांचे शाही पदके गमावल्यानंतर, प्रिन्स अँड्र्यू आता ‘अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर’ म्हणून ओळखले जातील.
SL/ML/SL
 
                             
                                     
                                    