बृजभूषण यांनी घरातच थाटलं भारतीय कुस्ती महासंघाचं कार्यालय
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महीला कुस्तीपट्टूंवर लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष यांनी महासंघाची सूत्रे पुन्हा एकदा अप्रत्यक्षरीत्या हाती घेतल्याचे दिसत आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या घरातच कुस्ती महासंघाचे कार्यालय थाटले आहे. ते अनेक वर्षे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी अनेक महिला कुस्तीपटूंचं लैंगिंक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. ऑलिम्पिक पदकविजेती मल्ल साक्षी मलिक, आंतरराष्ट्रीय ख्यातीची मल्ल विनेश फोगाट यांच्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या अनेक महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर आंदोलन केलं होतं. त्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच कुस्ती महासंघाचं कार्यालय त्यांच्या घरातून स्थलांतरित करण्यात आलं होतं. आता ते कार्यालय पुन्हा एकदा बृजभूषण शरण सिंह यांचे घर २१, अशोका रोड दिल्ली येथे हालवण्यात आलं आहे.
महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर बृजभूषण शरण सिंह यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी करावी लागली होती. त्यानंतर कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत त्यांनी त्यांचेच निकटवर्तीय संजय सिंह यांना उभं केलं. संजय सिंह यांनी ती निवडणूक जिंकली व ते आता कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. तर दुसऱ्या बाजूला बृजभूषण शरण सिंह यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नाही. मात्र, त्यांनी आता कुस्ती महासंघाचं कार्यालय दिल्लीतल्या हरी नगर येथून पुन्हा एकदा बृजभूषण शरण सिंहांच्या घरी स्थलांतरित करण्यात आलं आहे. सिंह यांनी कुस्ती महासंघावर पकड मिळवण्यास सुरुवात केली आहे
SL/ML/SL
25 Jan. 2025