मिनी लोकसभा निवडणुकीत भाजपची बाजी, काँग्रेसलाही समाधान

नवी दिल्ली, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळाले, तर तेलंगणात काँग्रेसचे बहुमत मिळाले आहे.
राजस्थानमध्ये भाजपला 115 जागा, काँग्रेसला 69 जागा, मध्य प्रदेशात भाजपला 167 जागा, काँग्रेसला 62 जागा आणि छत्तीसगडमध्ये भाजपला 56 जागा, काँग्रेसला 34 जागा मिळत असल्याचे दिसत आहे. तेलंगणात काँग्रेसला 64 जागा, सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला (BRS) 39 जागा, भाजपला 8 आणि AIMIM ला 7 जागा मिळल्या आहेत.
या निकालाबाबत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करुन आपली भूमिकाही मांडली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील जनादेश आम्ही नम्रपूर्वक स्विकारतो. ही विचारधारेची लढाई मात्र सुरुच राहिल.
त्याचबरोबर तेलंगणातील जनतेचे मी मनःपुर्वक आभार मानतो. तसेच सर्वसामन्यांचं सरकार स्थापण करण्याचं वचन आम्ही जरुर पूर्ण करु. सर्व कार्यकर्त्यांना त्यांची मेहनत आणि समर्थनासाठी मनापासून धन्यवाद देतो, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
SL/KA/SL
3 Dec. 2023