बेळगाव महापौर पदी भाजपाच्या सोमणाचे
बेळगाव, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बेळगावच्या महापौरपदी भाजपच्या शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली तर भाजपच्या रेश्मा पाटील उप महापौर निवडणुकीत विजयी झाल्या.
बेळगाव महानगरपालिका निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आल्यावर तब्बल चौदा महिन्यांनी महापौर आणि उप महापौर निवडणूक घेण्यात आली.महापौर निवडणुकीसाठी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी अर्ज दाखल केला नाही त्यामुळे शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली.उप महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजप तर्फे रेश्मा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर समितीतर्फे वैशाली भातकांडे यांनी अर्ज दाखल केला होता.
रेश्मा पाटील यांना 42 मते तर वैशाली भातकांडे यांना चार मते मिळाली .निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित असलेले प्रादेशिक आयुक्त एम.जी.हिरेमठ यांनी महापौर आणि उप महापौर निवडणुकीचा निकाल जाहीर केला.
निवडीनंतर सभात्याग
महापौर आणि उप महापौर निवडणूक झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.महापौर,उप महापौर निवडणुकीला सहा जण अनुपस्थित राहिले.तीन नगरसेवक तीन मिनिटे उशिरा आल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला.यावेळी उशीर करून आलेल्या नगरसेवकांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली पण त्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही.
सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले.त्या नंतर दुपारी तीन वाजता महापौर,उप महापौर निवडणुकीला प्रादेशिक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी एम. जी.हिरेमठ यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.निवडणूक झाल्या नंतर निवडणूक अधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी निवडणुकीचा निकाल घोषित केला.BJP’s Soman for the post of Belgaum Mayor
ML/KA/PGB
6 Feb. 2023