नेत्रदानाचा व रक्तदानाचा व आरोग्य तपासणीचा वाढदिवसानिम्मित निर्धार

 नेत्रदानाचा व रक्तदानाचा व आरोग्य तपासणीचा वाढदिवसानिम्मित निर्धार

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निर्धार सामाजिक संस्था आणि झेंडा सामाजिक संस्था सयुंक्त विद्यमाने समाजसेवक निलेशभाऊ आहेर व विशाल बेलकर यांच्या वाढदिवसानिम्मित कामोठे येथे रक्तदान शिबिराचे व नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी 41 रक्तदात्यांची रक्तदान करून गरजूंना मदतीचा हात दिला. हे रक्त रक्तपेढीकडे सोपविण्यात आले आहे.
महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत हिमोग्लोबिन व कॅल्शिअम ची तपासणी करून डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला घेतला. वाढत्या महामारी व इतर आजारांमध्ये अनेकांना रक्ताची गरज भासत आहे. अशावेळी एखाद्या रुग्णाला रक्ताचा तुटवडा भासू नये या उद्देशाने अनेक जण रक्तदानासाठी पुढे येत आहेत. त्यानुसार वाढदिवसाचे औचित्य साधुन कामोठे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होत.कार्यक्रमाला पाहुणे dr सखाराम गारळे,नगरसेवक विकास घरत,सामाजिक कार्यकर्ते गौरव पोरवाल,अल्पेश माने,अनंत वारे साहेब,पोपट आवारी मराठी कामगार सेना अध्यक्ष महेशभाई जाधव यांनी उपस्थिती लावली.

विविध संस्था व मंडळे यांचे सहकार्य नेत्रदान शिबिराला व रक्तदान शिबिराला मिळाले.याप्रसंगी संस्थेचे सदस्य जय पावणेकर,किरण भोसले,निरव नंदोला,पंकज साळवे,मंगेश शिंदे,अभिषेक शिंदे,रोहित पाटील,सुरेश झोरे,रवी पाधी,भीम चव्हाण व तसेच श्री स्वामी सेवा केंद्राचे सेवेकरी यांनी सेवा देऊन कार्यक्रम यशस्वी केला. Birthday determination of eye donation and blood donation and health check-up

PGB/ML/PGB
18 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *