कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकमांवर येतोय बायोपिक, हा अभिनेता मुख्य भूमिकेत
मुंबई, दि. १७ : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्यावर बायोपिक येत आहे. बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता राजकुमार राव यात मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतीच अभिनेता राजकुमार रावने बोलती खिडकियाँ शॉर्ट फिल्म महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी राजकुमारच्या बदलत्या लूकने सर्वांनाच हैराण केले. यावेळी अभिनेत्याने त्याच्या दोन बायोपिकबद्दल महत्त्वाचा खुलासा केला. राजकुमार रावने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्यावरील निकम या बायोपिकसाठी 9-10 किलो वजन वाढवले होते, आता तो सौरभ गांगुलीच्या चित्रपटासाठी वजन कमी करण्याची तयारी करत आहे.
याबाबत राजकुमार रावने एक सोशल मीडिया पोस्टही केली आहे. “माझे अस्तित्व माझ्या कलेतून आहे. माझी पुढची बायोपिक NIKAM चे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यासाठी मला शारीरिक बदल करावे लागले जे करायला मला आवडते. मी जोपर्यंत मी माझ्या कठोर परिश्रमातून लूक मिळवू शकतो तोपर्यंत मी प्रोस्थेटिक्सवर विश्वास ठेवत नाही. मग ते वजन वाढवणे असो किंवा वृद्ध दिसणे असो किंवा माझे केस पातळ करणे असो. ज्याला माझ्या हेअरस्टाईलिस्टचा कडाडून विरोध होता,” असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
SL/ML/SL