भारतात 4.12 लाख कोट्याधीश, सर्वाधिक कोट्याधीश कुटुंबे मुंबईत

 भारतात 4.12 लाख कोट्याधीश, सर्वाधिक कोट्याधीश कुटुंबे मुंबईत

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाचे संकट (corona crisis) असतानाही भारतातील कोट्याधीशांची (billionaires in India) संख्या थक्क करणारी आहे. सध्या भारतात 4.12 लाख कोट्याधीश आहेत. हारून इंडिया वेल्थ रिपोर्ट्मध्ये हे सांगण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई हे देशातील सर्वाधिक कोट्याधीशांचे शहर आहे. तर राजधानी दिल्ली दुसर्‍या क्रमांकावर आहे.

समभाग आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकीला प्राधान्य
Priority to investing in stocks and real estate

अहवालानुसार भारतीय कोट्याधीश (billionaires in India) समभाग (shares) आणि रिअल इस्टेटमध्ये (real estate) गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. मात्र ही दोन्ही क्षेत्रे गुंतवणूकीसाठी जोखमीची मानली जातात. अहवालानुसार भारतातील या कोट्याधीशांकडे किमान सात कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांची सरासरी मालमत्ता एक हजार कोटी रुपये आहे.

महाराष्ट्र-उत्तर प्रदेशात सर्वाधिक कोट्याधीश
Maharashtra-Uttar Pradesh has the highest number of billionaires

अहवालानुसार देशातील एकूण कोट्याधीशांपैकी 70.3 टक्के पहिल्या 10 राज्यात राहतात. शहरांपैकी मुंबई आणि दिल्ली अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकावर आहेत. राज्यांमध्ये 56 हजार कोट्याधीशांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेश 36 हजार कोट्याधीशांसह दुसर्‍या स्थानावर आहे. तामिळनाडू 35 हजारांसह तिसर्‍या, कर्नाटक 33 हजारांसह चौथ्या आणि गुजरात 29 हजारांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

जीडीपीमधील योगदान
Contribution to GDP

या अहवालानुसार मुंबईत 16933 कोट्याधीश कुटुंबे आहेत जी देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 6.16 टक्के योगदान देतात. त्यानंतर, दिल्लीत 16,000 कुटुंबे आहेत जी एकूण जीडीपीच्या 4.94 टक्के वाटा देतात. त्यानंतर शहरांमध्ये 10 हजार कोट्याधीश कुटुंबांसह कोलकाता तिसर्‍या क्रमांकावर आहे. हारून इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनस रहमान जुनैद यांचे म्हणणे आहे की या कोट्याधीशांमुळे भारतात लक्झरी ब्रँडची बाजारपेठ झपाट्याने वाढली आहे.
लक्झरी कारच्या बाबतीत भारताच्या या कोट्याधीशांची (billionaires in India) पहिली पसंती मर्सिडीजला आहे. त्यापाठोपाठ बीएमडब्ल्यू आणि जग्वारचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, स्पोर्ट्स कारच्या बाबतीत, लॅम्बोर्गिनी ही पहिली पसंती आहे. त्यानंतर पोर्शे आणि ऑस्टन मॉर्टिन यांचा क्रमांक लागतो. घड्याळांच्या बाबतीत रोलेक्स ही त्यांची पहिली पसंती आहे. दागिन्यांच्या बाबतीत, तनिष्क हा त्याचा आवडता लक्झरी ब्रँड आहे. तर हॉटेल्सच्या बाबतीत ताज पहिल्या तर मॅरियट दुसर्‍या क्रमांकावर आहे.

खासगी बँकांच्या व्यवहाराला प्राधान्य
Priority to private bank transactions

हारूनच्या अहवालानुसार एचडीएफसी बँक या कोट्याधीशांना भुरळ पाडण्यात आघाडीवर आहे. त्यानंतर आयसीआयसीआय बँक आहे. वीमा कंपन्यांमध्ये भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) ही त्यांची पहिली पसंती आहे. एअरलाईन्सच्या बाबतीत एमिरेट्स एअरलाईन्स त्यांची पहिली पसंती आहे. सिंगापूर एअरलाइन्स दुसर्‍या आणि एतिहाद तिसर्‍या क्रमांकावर आहे.
Despite the corona crisis, the number of billionaires in India is staggering. There are currently 4.12 lakh billionaires in India. This is stated in the Haron India Wealth Report. According to him, Mumbai is the city of the most billionaires in the country. The capital Delhi is in second place.
PL/KA/PL/17 MAR 2021
 

mmc

Related post