GDP चा सात तिमाहीतील सर्वात मोठा धक्का आणि भू-राजकीय तणाव: बाजार कोणत्या दिशेने?

मुंबई, दि. ३० ( जितेश सावंत) : गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहावयास मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील आघाडीने संपादन केलेल्या विजयाला सलामी देत मोठी झेप घेतली ,सेन्सेक्स १४०० अंकांपेक्षा जास्त वाढला.
परंतु गुरुवारी रशियाने युक्रेनच्या ऊर्जा सुविधांवर हल्ला केल्याने भू-राजकीय तणाव वाढला त्याचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला त्यातच फ्युचर्स आणि ऑप्शन्स एक्स्पायरीशी संबंधित विक्रीमुळे बाजार कमकुवत झाला. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराने हेल्थकेअर आणि फार्मा समभागांच्या जोरदार खरेदीमुळे पुन्हा गती घेतली.

बाजारासाठी धक्कादायक बातमी

शुक्रवारी जाहीर झालेला आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) देशाचा आर्थिक विकास दर अपेक्षेपेक्षा खूप कमी झाला. दुसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) वाढीचा दर ५.४ टक्के होता, तो सात तिमाहीतील सर्वात कमी आहे.यामुळे संपूर्ण आर्थिक क्षेत्रासाठी विकास दराचा अंदाज कमी होण्याची शक्यता वाढली आहे.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष,
प्रामुख्याने GDP आकड्यांवरील प्रतिक्रिया,महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी , FII ची भूमिका(FII outflow) , जागतिक संकेत (global cues)या कडे राहील.

Technical Analysis of Nifty:

Closing on Friday: Nifty closed at 24131.1
Key Support
Levels :-24,123,24,056,23,992,23,960,23927,23907.3,23,893,23,805,23,723, 23,645 and 23629 Breaking these could lead Nifty to further lower levels.

Resistance Levels,

24148,2,24180.8, 24193, 24240, 24280, 24331, 24367, 24,388, 24414, 24433, 24,449, 24502.2, 24,530.9, 24,543, 24,587, 24,619, 24,631, 24,686, 24,717.7, 24,736, 24,754, and 24,789.

These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.

लेखक — शेअरबाजार आणि सायबर कायदा तज्ञ आहेत

ईमेल: jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर): @JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *