राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप , शरद पवारांना धक्का देत अजित पवार सरकारमध्ये

 राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप , शरद पवारांना धक्का देत अजित पवार सरकारमध्ये

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एक वर्षापूर्वी उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का देत भाजपने शिवसेनेचे चाळीस आमदार आपल्या सोबत घेतलेले असतानाच आज खुद्द शरद पवारांनाच प्रचंड धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाच सत्तेत सामील करून घेतले आहे, आता अजित पवार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री असणार आहेत, त्यांनी आज या पदाची शपथ घेतली.

आज सकाळपासून अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या होत्या त्याचे पर्यवसान राजभवनावर अचानक झालेल्या शापथविधी होण्यात झाले. अजित पवार यांच्या सह राष्ट्रवादीच्या तब्बल नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या मोठ्या नेत्यांचा त्यात समावेश आहे तर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे देखील यावेळी उपस्थित होते.

साडे तीन वर्षांपूर्वी शिवसेना आपल्या सोबत येत नसताना एके सकाळी अचानक देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या सोबत शपथ घेत आपले सरकार स्थापन केले होते , मात्र अवघ्या चार दिवसात ते सरकार गडगडले होते. खुद्द शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला होता असे फडणवीस त्यानंतर वारंवार सांगत होते मात्र शरद पवार शब्दांचे खेळ करीत ते कायम नाकारत राहिले आहेत. मात्र आज झालेली ही घडामोड ही शरद पवार यांना प्रचंड मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

आजच्या या शपथविधी नंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सामील झालो आहोत. यापुढे देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांशी चर्चा करूनच घेतला असल्याचे म्हटले. शरद पवार यांचा याला पाठिंबा आहे का यावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले आहे तर दुसरीकडे नेमके किती आमदार तुमच्या सोबत आहेत याचेही उत्तर त्यांनी दिलेले नाही.Big earthquake in state politics, Ajit Pawar in government, giving a shock to Sharad Pawar

ML/KA/PGB
2 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *