भिडे गुरुजींना दुसऱ्यांना नोटीस
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला पत्रकाराशी बोलताना केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले संभाजी भिडे यांना महिला आयोगाने सोमवारी दुसऱ्यांना नोटीस बजाविली आहे.या नोटीशीत त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.Bhide Guruji notice to others
नोटिशीला विहीत मर्यादेत उत्तर न दिल्यास त्यांचे काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे,’ असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत त्यांना एका खासगी वाहिनीच्या महिला पत्रकाराने विचारणा केली असता, ‘प्रत्येक स्त्री भारतमातेचे रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,’ अशी प्रतिक्रिया भिडे यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेत त्यांना 2 नोव्हेंबर रोजी
नोटीस बजावली. या नोटिशीला भिडे यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. आता सोमवारी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दुसरी नोटीस बजावली आहे.
ML/KA/PGB
8 Nov .2022