भरडा का कलेवा

 भरडा का कलेवा

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पारंपारिक छत्तीसगढ़ी स्नॅक्स (काळेवा) बनवण्याची प्रक्रिया

लागणारे जिन्नस: 

ज्वारी / बाजरी (भरडधान्य) : २ वाट्या
ताक / फेटलेले दही : ३ कप
लसूण : ४-५ पाकळ्या
जिरे, ओवा, मिरे : १ लहान चमचा
साजूक तूप
लाल सुक्या मिरच्या : २
जिरे , हिंग : पाव चमचा
कढीपत्ता : १ डहाळी

मीठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

एका भांड्यात २ वाट्या ज्वारी घेऊन त्यात पाणी घाला. प्रेशर कुकरमध्ये २ शिट्ट्या वाजवून शिजवा. शिजल्यावर आणि थंड झाल्यावर थोडे मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. भरडा म्हणजे भरड धान्य, तर काळेवा म्हणजे हलका आणि फुगलेला नाश्ता. मूळ रेसिपीनुसार दाणे २-३ दिवस भिजत ठेवावेत.

खलबत्यात ४-५ पाकळ्या लसूण, जिरे, मिरे आणि ओवा कुटून घ्या. एकदम बारीक नको. जरासंच ठेचायच आहे.

आता एका पातेल्यात तूप गरम करून त्यात जिरे तडतडून घ्या. त्यात सुक्या लाल मिरच्या, हिंग आणि कढीपत्ता आणि लसणाचं वाटण घालून खमंग फोडणी करून घ्या. यात ज्वारीची भरड घालून दोन मिनिटे परतून घ्या. आता पातळ केलेले दही / ताक आणि चवीनुसार मीठ घालून उकळी येऊ द्या. गरज वाटल्यास थोडे पाणी घाला. लापशी इतके पातळसर शिजवायचे. झाकण ठेवून ५ मिनिटे शिजू द्या.

चमचाभर तूप घालून गरम गरम गट्ट करा. आवडत असल्यास वरून लिंबू पिळून घ्या.

Bharda Kaleva

ML/KA/PGB
9 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *