IPL मुळे बेस्टला मिळतोय असा फायदा

 IPL मुळे बेस्टला मिळतोय असा फायदा

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IPLचे काही सामने मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होत असल्याचा घवघवीत फायदा ‘बेस्ट’ला होत आहे. सामन्यांना प्रेक्षकांमध्ये बसणाऱ्या लहान मुलांना वानखेडे स्टेडियमवर आणण्याचे काम बेस्ट उपक्रमाच्या ५०० बसेसद्वारे केले जात असल्याने त्यातून बेस्टला ६० ते ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
वानखेडेवर ११ एप्रिलला झालेल्या मुंबई-बंगळुरु सामन्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या बेस्ट बसेसमध्ये वातानुकुलित, विनावातानुकूलित, दुमजली बसचा समावेश होता. त्यांमधून सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांना वानखेडेवर आणण्याची जबाबदारी बेस्टकडे होती.

एका बससाठी किमी अंतर आणि बस उभी करण्याचा कालावधी मोजून साधारणपणे १२ ते १८ हजार रुपये आरक्षण रक्कम भरावी लागते. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांमुळे बेस्टला प्रतिदिवशी ६० ते ८० लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. आगामी दिवसांत वानखेडे स्टेडियमवर १४ एप्रिल रोजी मुंबई वि. चेन्नई, ३ मे रोजी कोलकाता विरुद्ध मुंबई, ६ मे या दिवशी मुंबई विरुद्ध हैदराबाद आणि ७ मे रोजी मुंबई आणि लखनौ हे सामना होणार आहेत.

SL/ML/SL

13 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *