करवीरनिवासिनीच्या शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात

 करवीरनिवासिनीच्या शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात

कोल्हापूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात आज पासून घटस्थापनेने शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. यानिमित्ताने करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

सकाळपासूनच अंबाबाई मंदिरात अंबाबाईच्या विधिवत धार्मिक विधींना सुरुवात झाली असून घटस्थापना झाली.
नवरात्र उत्सवा दरम्यान देवीची विविध रूपातील पूजा बांधण्यात येणार आहे.
मंदिर परिसरात मोठं भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे.

यंंदा महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू गोवा गुजरात आदी राज्यांतून सुमारे पंधरा ते वीस लाख भाविक दर्शनासाठी अपेक्षित आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यंदाच्या नवरात्र उत्सवासाठी कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी देवीचे मुखदर्शन सुरक्षा यंत्रणा आणि विविध उपक्रम कार्यक्रमांसह सिध्द आहे. Beginning of Sharadiya Navratri festival of Karveer Nivasini

ML/KA/PGB
15 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *