बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट करणाऱ्याला अखेर अटक

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे येत असताना बीड शहराजवळील लक्ष्मी चौक येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून चाटे याला अटक केली. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहचली असून अजूनही तीन आरोपी फरार आहेत. विष्णू चाटे याच्यावर सरपंच देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
ML/ML/PGB
18 Dec 2024