निकाराग्वाच्या सौंदर्यवतीने जिंकला मिस युनिव्हर्स 2023 किताब

 निकाराग्वाच्या सौंदर्यवतीने जिंकला मिस युनिव्हर्स 2023 किताब

सॅन साल्वाडोर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): मध्य अमेरिकेतील निकाराग्वा या लहानशा देशातील सौंदर्यवतीने यावर्षीचा मिस युनिव्हर्स किताब जिंकला आहे. Beauty of Nicaragua wins Miss Universe 2023 title

निकाराग्वाच्या शेन्निस पलासियोसलाने (Sheynnis Palacios) मिस युनिव्हर्स 2023 चा मुकुट पटकावला आहे. तिने हा किताब जिंकल्याचे जाहीर झाल्यावर गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स अमेरिकेची आरबोनी गॅब्रियलने तिला मिस युनिव्हर्सचा (Miss Universe 2023) मुकुट घातला.
ऑस्ट्रेलियाची मोराया विल्सन (Moraya Wilson) दुसरी रनर अप तर थायलंडची एन्टोनिया पोर्सिल्ड (Anntonia Porsild) फर्स्ट रनर अप ठरली.

या स्पर्धेमध्ये जगभरातील 90 देशांच्या स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. जेनी मे,मारिया मेनॉनस आणि माजी मिस युनिव्हर्स ओलिव्हिओ कुलपो हे यावर्षी मिस युनिव्हर्स 2023चे आयोजक होते. यावर्षी पहिल्यांदा असे झाले आहे की मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या आयोजनामध्ये फक्त महिलाच होत्या.

भारताची मिस युनिव्हर्स स्पर्धेतली स्पर्धक श्वेता शारदा आणि पाकिस्तानची स्पर्धक एरिका रॉबिन यावर्षीच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत टॉप 10 च्या यादीत स्थान मिळवण्यात अयशस्वी ठरल्या. दोघींना टॉप 20 मध्ये स्थान मिळाले.

पाकिस्तानी स्पर्धक यावर्षी प्रथमच या स्पर्धेत सहभागी झाली आहे.
SL/ KA/ SL
19 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *