बंगाली खिचडी, खिचुरी

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
गोविंदभोग तांदूळ – पाऊण वाटी
मूग डाळ – पाऊण वाटी
आले पेस्ट – १ टे स्पून
जिरे पूड – १ टी स्पून
हळद – १ टी स्पून
ओले खोबरे – ३ – ४ टे स्पून
लाल मिरची – २
लवन्ग , वेलदोडा – २
दालचिनी , तमालपत्र – १
बटाटा , टोमॅटो – १ (लहान)
फ्लॉवरचे तुरे – ३/४
मटार दाणे – पाव वाटी
तूप – २ टे स्पून
गरम मसाला – १ टी स्पून
साखर – १ टे स्पून
हिरवी मिरची – १ उभी कापून
जिरे – १ टी स्पून
मीठ चवीनुसार
पाणी – ६ -७ कप
मोहरी तेल – २ -३ टे स्पून खिचडी फोडणीसाठी
शेंगदाणा तेल – बटाटा आणि फ्लॉवर परतण्यासाठी आणि तांदूळ परतण्यासाठी
क्रमवार पाककृती:
प्रथम तांदूळ २ वेळा स्वच्छ धुवून पूर्ण पाणी उपसून एका परातीत घ्यावा.
मूग डाळ मंद आचेवर ६-७ मिनिट परतून घ्यावी, गुलाबीसर रंग येइतोवर. आता मूग डाळ एका भांड्यात काढा , थोडी गार झाली की एकदाच पाण्याने धुवून घ्या आणि पाणी काढून टाका.
एका कढईत १ टे स्पून शेंगदाणा तेल घेऊन तांदूळ २-३ मिनिट परतून घ्या आणि परातीत काढा. त्याच कढईत ३-४ टे स्पून शेंगदाणा तेल घेऊन आधी बटाटा मग फ्लॉवरचे तुरे परतून घ्या.
आले, हळद आणि जिरे पावडर एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून एक पेस्ट बनवा.
आता खिचडी ज्या भांड्यात करायची आहे ते भांडे घ्या त्यात मोहरी तेल घ्या, तेल तापले की त्यात जिरे, दालचिनी , तमालपत्र, लाल मिरची, ओले खोबरे, लवंग, वेलदोडा घाला. २ मिनिट परतून त्यात आले, हळद आणि जिरे पावडर पेस्ट घाला. हे मंद आचेवर करायचे आहे, मसाले जळू नयेत म्हणून. हवे असल्यास थोडे पाणी घाला मसाले जळू नयेत म्हणून.
आता अजून २-३ मिनिटे परतून त्यात तांदूळ आणि मूग डाळ घाला. हिरवी मिरची घाला. थोडे परतून त्यात चवीनुसार मीठ घाला आणि ६-७ वाट्या पाणी घाला.
एक उकळी आली की त्यात परतलेला बटाटा आणि फ्लॉवर घाला आता झाकण ठेवून १० मिनिटे खिचडी शिजत ठेवा.
१० मिनिटांनी त्यात टोमॅटो , मटार दाणे, साखर आणि गरम मसाला घाला. अजून ८-१० मिनिटे मंद आचेवर खिचडी शिजवा. शेवटी त्यात तूप सोडा. आणि अजून १ मिनिट शिजून घ्या.
बंगाली खिचडी, खिचुरी
ML/ML/PGB
16 Apr 2024