३१ जुलैपर्यंत पुण्यातल्या ‘या’ पर्यंटनस्थळांवर जमावबंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 ३१ जुलैपर्यंत पुण्यातल्या ‘या’ पर्यंटनस्थळांवर जमावबंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी आणि भुशी डॅम परिसरात गेल्या आठवड्यात दोन अपघाताच्या घटना घडल्या. त्यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांवर ३१ जुलैपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, खेड, इंदापूर या ठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. तर धबधब्याच्या १ किलोमीटर परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशास मनाई आहे. या परिसरात मद्य बाळगण्यास, मद्यपान करण्यास बंदी आहे. पर्यटकांनी स्वतहून बंधने पाळावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *