बाबा आमटे मानवता पुरस्कार प्रदान
वर्धा, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दिवंगत समाजसेवक बाबा आमटे baba amte यांच्या स्मृतिपित्यर्थ दिल्या जाणारा बाबा आमटे मानवता पुरस्कार यवतमाळ येथील शेतकरी हितासाठी अतुल्य कार्य करणारे पंकज महल्ले आणि श्वेता महल्ले ठाकरे यांना आज वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्रदान करण्यात आला.
वरोरा येथील ज्ञानदा विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार समीर कुणावर, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पोपटराव पवार, यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ML/KA/PGB
4 Jan 2022