निवडणूक कार्यात उत्कृष्ट कार्य करणारे पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार
पालघर, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकशाहीचा ढाचा अबाधित पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत.Awards to Journalists and Social Organizations for Outstanding Performance in Election Work
निवडणुका निःपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेऊन यंदापासून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी निवडणूक वार्तांकन पुरस्कार दिला जाणार आहे. तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मतदार मित्र पुरस्कार दिला जाणार आहे. १० हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असेल. हे पुरस्कार २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात वितरित केले जातील.Awards to Journalists and Social Organizations for Outstanding Performance in Election Work
पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वतः अर्ज करु शकतात. त्याकरता मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्याची अहवाल स्वरुप माहिती आणि छायाचित्रांसह आपला अर्ज democracybook@gmail.com या ई-मेल आयडीवर दि. ०७ जानेवारी, २०२३ पर्यंत पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ML/KA/PGB
03 Jan. 2023