जागतिक क्रीडा फोटोग्राफी स्पर्धेत अतुल कांबळे यांना पुरस्कार

 जागतिक क्रीडा फोटोग्राफी स्पर्धेत अतुल कांबळे यांना पुरस्कार

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकर फोटोग्राफर अतुल कांबळे यांनी यंदाच्या जागतिक क्रीडा फोटोग्राफी स्पर्धेत दोन पुरस्कार पटकावून बाजी मारली आहे. वर्ष 2023 च्या क्रिकेट आणि मल्लखांब गटात अतुल कांबळे यांना विशेष उत्तेजनार्थ गटात पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जागतिक क्रीडा फोटोग्राफी स्पर्धेचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. जगभरातील 70 हून अधिक देशांमधून 700 फोटोग्राफर्सनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. मिड डे या सायंदैनिकासाठी अतुल कांबळे यांनी हे दोन फोटो टिपले होते.

अतुल कांबळे यांनी 25 ऑगस्ट 2022 रोजी वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर झोपडपट्टीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जिम्नॅस्टिकचा सराव करणाऱ्या मुलांचा फोटो टिपला होता. तर दुसरा फोटो शिवाजी पार्क वर बॅटिंगचा सराव करणाऱ्या खेळाडूंचा होता. याआधी जागतिक फोटो स्पर्धेत अतुल कांबळे यांनी सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या दिवशी त्याचे चहाते मोबाईलवर सचिनचे फोटो काढतानाचा काढलेला फोटो पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

ML/KA/SL
22 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *