अवकाळी पावसाचा द्राक्ष बागातदारांना फटका
जालना, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी रिमझिम पाऊस बरसत आहे. या पावसाचा जालन्यातील कडवंची, नाव्हा, धारकल्याण या परिसरातील द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी रिमझिम पावसामुळे द्राक्षबागांवर डावनी, कुज, भुरी यासह इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. दरम्यान जालनाच्या तहसीलदार छाया पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. फळ पीक नुकसानी बाबत कृषी विभागाला सांगितलं असून कृषी विभागाचे अधिकारी कारवाई करतील अशी प्रतिक्रिया तहसीलदार पवार यांनी दिली. मात्र अवकाळी पाऊस झाल्यानंतर ही कृषी विभाग शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
ML/ML/PGB 6 Dec 2024