जी-20 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आकर्षक विद्युत रोषणाई

नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जी-20 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपराजधानी नागपुरात येणाऱ्या पाहुण्यांचा स्वागतासाठी नागपूरात आकर्षक विद्युत रोषणाईने रस्ते चकाकले आहेत. जी 20 अंतर्गत नागपुरात 20 आणि 21 मार्चला बैठकी निमित्य ही रोषणाई करण्यात आलीय.
शहरातील ऐतिहासिक वारसा असलेलं झिरो माईल असो की सिव्हिल लाईन परिसरातील शासकीय कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आलीयAttractive electric lighting for the G-20 International Conference
विमानतळापासून मुख्य मार्ग आणि मेट्रोच्या उड्डाण पुलाला करण्यात आलेली रंगीत विद्युत रोषणाई डोळे दिपवणारी आहे. हिरवेगार झाडांवर झुंबर, लाईटिंगमुळे प्रवास करताना वेगळाच अनुभव सध्या नागपुरकरांना येत आहे.
बैठकीला येणाऱ्या विविध देशातील पाहुण्याच्या स्वागतासाठी जोरदार तय्यारी दिसून येत आहे.
ML/KA/PGB
16 Mar. 2023