#आशियाई विकास बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अंदाजात केली सुधारणा

 #आशियाई विकास बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अंदाजात केली सुधारणा

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियाई विकास बँकेने (एडीबी) गुरुवारी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातल्या आपल्या अंदाजात सुधारणा करत सांगितले की आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान 8 टक्क्यांची घट पहायला मिळु शकते, याआधी ती नऊ टक्के घसरणार असल्याचे सांगण्यात आले होते. एडीबीने सप्टेंबर महिन्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भात अंदाज व्यक्त केला होता की चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 9 टक्क्यांनी घसरु शकते.
आशियाई विकास परिस्थितीच्या (एडीओ) पूरक अहवालात म्हटले आहे की अर्थव्यवस्था सामान्य स्थितीत येत आहे आणि दुसर्‍या तिमाहीत घट 7.5 टक्के होती, जी अपेक्षेपेक्षा चांगली आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या जूनच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेमध्ये 23.9 टक्क्यांनी घट झाली होती. अहवालानुसार, आथिर्क वर्ष 2020 साठी जीडीपीचा अंदाज नऊ टक्क्यांच्या घसरणीवरुन वाढवून आठ टक्के करण्यात आला आहे आणि दुसर्‍या सहामाहीत जीडीपी एक वर्षापूर्वी इतका रहाण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठीच्या वाढीचा अंदाज आठ टक्क्यांवर कायम आहे. अहवालात म्हटले आहे की भारतातील आर्थिक सुधारणा अपेक्षेपेक्षा चांगली आहे आणि यामुळे दक्षिण आशियातील घसरणीचा 6.8 टक्क्यांचा अंदाज सुधारुन 6.1 टक्के करण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देखील चालू आर्थिक वर्षाच्या (2020-21) सुधारित अंदाजामध्ये आर्थिक वाढीचा दर -7..5 टक्के राहील, असा अंदाज वर्तविला आहे. याआधी तो -9.5 टक्के रहाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भारतीय अर्थव्यवस्था सप्टेंबरच्या तिमाहीत व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा जास्त वेगाने प्रगती करत आहे. यामागील एक कारण म्हणजे उत्पादन क्षेत्रात आलेली तेजी हे आहे, जी जीडीपीला 7.5 टक्क्यांच्या कमी घसरणीच्या पातळीवर पोहोचण्यास मदत करत आहे आणि भविष्यातील ग्राहकांच्या चांगल्या मागणीसाठी अपेक्षा निर्माण करत आहे.
Tag-Asian Development Bank/Indian Economy/Revised/Forecast
PL/KA/PL/11 DEC 2020

mmc

Related post