आसाराम बापूला सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन, इतके दिवस राहणार तुरूंगाबाहेर
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :2013 मध्ये लैंगिक शोषण, बलात्कार प्रकरणी जन्मठेप झालेया आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ८५ वर्षीय आसाराम बापूला ३१ मार्च पर्यंत अंतरीम जामीन मंजूर झाला आहे. त्यांना अटीशर्तींसोबत अंतरिम जामीन दिला गेला आहे. त्यांना हृदयावर उपचार घेण्यासाठी हा जामीन दिला गेला आहे. मात्र, या काळात त्यांना आपल्या अनुयायांना भेटता येणार नाही, असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत. सध्या त्यांच्यावर जोधपूरच्या आरोग्य मेडीकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
ML/ML/PGB 7 Jan 2025