तब्बल ९ लाख सरकारी गाड्या १ एप्रिल पासून निघणार मोडीत
नवी दिल्ली,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारितील 15 वर्षांहून अधिक जुनी अशी सुमारे 9 लाख वाहने 1 एप्रिल पासून मोडीत निघणार आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (FICCI) कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
सरकारांच्या अखत्यारितील गाड्यांबरोबरच राज्य परिवहन मंडळ आणि सार्वजनिक कंपन्यांच्या मालकीच्या पंधरा वर्षांपेक्षा जुन्या गाड्या हद्दपार होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. इथेनॉल, मिथेनॉल, जैव सीएनजी, जैव एलएनजी तसेच इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सांगून गडकरी पुढे म्हणाले की,
सरकारच्या अखत्यारितील गाड्या हद्दपार केल्यानंतर त्यांची जागा ज्या नव्या गाड्या घेतील, त्या पर्यायी इंधनावर धावणाऱ्या असतील. सोलार उर्जा देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अशा स्थितीत इलेक्ट्रीक वाहनांत सोलार उर्जेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. लांब पल्ल्यावर धावणाऱ्या ट्रकसाठी एलएनजी हा एक चांगला पर्याय ठरु शकतो.
SL/KA/SL
31 Jan. 2023