रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत यांचा अर्ज दाखल…

रत्नागिरी, दि. १६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. राऊत तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याप्रसंगी आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, राजन साळवी सह अनेक शिवसेना तसेच आघाडीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रत्नागिरी शहरात भव्य मिरवणूक काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. अर्ज सादर केल्यानंतर प्रतिक्रिया देताना २.५ लाखांच्या मताधिक्याने आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले. दरम्यान आता सर्वांच्या नजरा महायुतीच्या उमेदवाराकडे लागल्या आहेत.
ML/ML/SL
16 April 2024