मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत यांनी भरला अर्ज

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. दीपक रामचंद्र सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. सकाळी १०.३० वाजता विलेपार्ले पूर्व येथील पार्लेश्वर मंदिरात आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डॉ.दीपक रामचंद्र सावंत शिवसैनिकांसह कोकण विभागीय आयुक्त कार्यालय , कोकण भवन , नवी मुंबई येथे पोहोचले. कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे डॉ. सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेनेचे प्रमुख नेते आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. २६ जून २०२४ रोजी महारष्ट्र विधान परिषदेसाठी मुंबई पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत आहे.
या निवडणुकीत डॉ. दीपक सावंत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून डॉ . सावंत यांनी काम पाहिलं आहे. ते यापूर्वी दोन वेळा पदवीधर मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यापूर्वी विधानसभा सदस्यातून ते निवडून आले आहेत. डॉ. सावंत यांनी केलेल्या कामांवर विश्र्वास ठेवून मतदारांनी त्यांना तीन वेळा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली.
ML/ML/SL
5 June 2024